-
Phone 022 68736020
-
-
Whatsapp 8879716979
अकबर ट्रॅव्हल्स ऑनलाईनकडे आयआरसीटीसीच्या मुख्य एजंटचे काम सोपवण्यात आले आहे. प्रामुख्याने, भारतभरातून रेल्वेची तिकिटे आरक्षित करणाऱ्या एजंटची, म्हणजेच, 'आयआरसीटीसी एजंट'ची नियुक्ती करण्याचा अधिकार अकबर ट्रॅव्हल्स ऑनलाईनकडे सोपवण्यात आला आहे. आयआरसीटीसी एजंटची अकबर ट्रॅव्हल्सकडे नोंद झाल्यानंतर त्यांना एक नोंदणी क्रमांक देण्यात येतो. त्याचा वापर करून रेल्वे, बस, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाकरता तिकिटे काढता येतात. शिवाय, व्हिसा सुविधा, पर्यटन पॅकेज, प्रवासी विमा, पैशांची देवाणघेवाण आणि इतर अनेक सुविधांचाही लाभ घेता येतो.
तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, पर्यटन क्षेत्रात तुमची ओळख निर्माण करायची असेल किंवा तुम्ही उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग शोधत असाल तर आयआरसीटीसी एजंट या नोंदणी कार्यक्रमातून ही उद्दिष्टे साध्य करता येतील. आयआरसीटीसीचे अधिकारप्राप्त एजंट म्हणून तुम्ही तुमच्या सोयीनुसार दिवसातील अर्धावेळ किंवा पूर्णवेळ काम करू शकता. तुम्ही नोकरी करत असाल तरीही तुम्ही आयआरसीटीसी एजंटचे काम करू शकता. या कामाला वेळेचे काटेकोर बंधन नाही. त्यामुळे हे सहज शक्य आहे. या कामाकरता तुमच्याकडे ऑफिसची जागा असावी असे नाही. कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा आयआरसीटीसी मोबाईल ऍप्लिकेशन वापरून तुम्ही कुठूनही हे ई- तिकीट आरक्षणाचे काम करू शकता आणि लगेच कमिशन मिळवू शकता.
बहुतांश प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत ताटकळत रहायला आवडत नाही, त्यापेक्षा एजंटमार्फत तिकीट काढणे ते पसंत करतात. लोकांची सोय होणे आणि वेळेनुसार काम होणे महत्त्वाचे असते. अकबर ट्रॅव्हल्सचे नियम, बदल करण्याची, परतावा मिळवण्याची सोपी पद्धत प्रवाशांची मने जिंकून घेणारी आहे. 'अकबर' या नावाच्या वापरानेच तुमचा व्यवसाय वेगळी उंची गाठेल यात शंका नाही. रेल्वेमध्ये तिकीट आरक्षण आणि इतर सुविधांचे आरक्षण करताना तुम्हाला जास्तीतजास्त नफा कमावता येईल, हे निश्चित. आमच्यासह आयआरसीटीसी एजंट म्हणून काम केल्याने तुम्हाला पर्यटन क्षेत्रात मान्यता मिळेल. त्यामुळे तुमच्या पूर्वीच्या व्यवसायाची व्याप्ती वाढवायला मदतच होईल.
भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) ही भारतीय रेल्वेची पूरक संस्था आहे. भारतात ऑनलाईन तिकीट आरक्षण, खानपान आणि पर्यटन विषयक व्यवहार या महामंडळामार्फत होतात. आयआरसीटीसी मार्फत व्यक्तींना नव्हे तर काही प्रमुख एजंटना (मान्यताप्राप्त वितरक) परवाना दिला जातो. तुम्हाला मान्यताप्राप्त वितरकाकडून परवाना मिळवावा लागेल. देशभरातील ई-तिकीट आरक्षण एजंट नेमण्याकरता असलेल्या मान्यताप्राप्त वितरकांपैकी अकबर ट्रॅव्हल्स हे अग्रणी नाव आहे.
भारतीय रेल्वेच्या ई-तिकीट सुविधेद्वारे ५५% तिकिटे आरक्षित केली जातात. आयआरसीटीसीची स्थापना सन २००२मध्ये झाली. सुरुवात झाली तेव्हा आरक्षित तिकिटांची संख्या होती फक्त २९ आणि आता ही संख्या दररोज १५ लाख तिकिटे इतकी झाली आहे. सन २०१८मध्ये भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने रु. २८,४७५ कोटींची तिकिटे विकली. एकूण तिकीट विक्रीमध्ये ही वार्षिक १४% इतकी वाढ होती. आयआरसीटीसी प्रणालीवरुन सध्या मिनिटाला १५,००० तिकिटे आरक्षित करता येतात. एकावेळी ३ लाख वापरकर्ते ही वेबसाईट वापरू शकतात. ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्याचे हे भारतातील अग्रणी व्यासपीठ आहे. आयआरसीटीसीची तिकीट आरक्षण प्रणालीमध्ये भरपूर उत्पन्न वाढवण्याची क्षमता आहे. हे या आकड्यांवरुन लक्षात येईलच. ऑनलाईन तिकीट आरक्षणाकरता ही सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे हे निश्चित!
रेल्वेची ऑनलाईण तिकिटे आरक्षित करण्याकरता आणि इतर प्रवासी सुविधांचा लाभ घेण्याकरता दिलेला हा विशेष परवाना आहे. प्रत्येक आरक्षित तिकिटावर एजंटला समाधानकारक कमिशन मिळवता येते.
आयआरसीटीसीने नियुक्त केलेल्या प्रमुख एजंट म्हणजेच, अधिकृत वितरकाकडून आयआरसीटीसी एजंट परवाना दिला जातो. अधिकृत वितरकाशिवाय तुम्हाला असा परवाना मिळवता येणार नाही. आयआरसीटीसी एजंट परवाने देणारी अकबर ट्रॅव्हल्स ही अधिकृत वितरकाचे काम करणारी प्रमुख कंपनी आहे.
अकबर ट्रॅव्हल्सच्या मदतीने आयआरसीटीसी एजंट होण्याच्या ३ सोप्या पायऱ्या:
आयआरसीटीसी एजंटला प्रत्येक आरक्षित तिकीटावर नियमित उत्पन्न मिळते. एजंट दरमहा रु. ८०,००० किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवू शकतात.
कोणत्या प्रकारचे रेल्वे तिकीट काढले आहे त्यावर कमिशन अवलंबून असते. एजंटचे ग्राहक वाढले की नफा वाढण्याची हमी मिळेल. प्रत्येक आरक्षणावर सुयोग्य कमिशन मिळेल.
Theपुढील कागदपत्रे आवश्यक आहेत:
ही प्रक्रिया पूर्ण व्हायला साधारणपणे ३ दिवस लागतात.
होय. ही प्रक्रिया खूपच सोपी असते. तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यावर आमची माणसे तुम्हाला सर्व आवश्यक माहिती देतील.
होय. आयआरसीटीसी एजंट परवान्याच्या नोंदणीपासून रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्यापर्यंत आणि पोर्टलवरच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्याकरता आमची माणसे तुम्हाला प्रशिक्षण देतील आणि मार्गदर्शनही करतील.
होय. आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट म्हणून तुम्ही घरुन काम करू शकता किंवा स्वतःचे ऑफिसही सुरू करू शकता. ही तुम्हीच ठरवू शकता.
नाही. तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप असावा असे काही नाही. तुम्ही आमच्या मोबाईल ऍप्लिकेशन वरुनही रेल्वेची तिकिटे आरक्षित करू शकता.
भारतीय रेल्वेने भारतभरात सर्वत्र किफायतशीर पर्यटन करता येते. शहर पर्यटन, धार्मिक पर्यटन, आरामदायी पर्यटन, साहसी कॅम्प आणि ट्रेक यांपैकी निवड करता येते. या देशांतर्गत पर्यटनात रेल्वे तिकिटे, जेवण, रहाण्याची सोय, विमा आणि तुम्ही निवडलेल्या पॅकेजनुसार दर्शनाची तिकिटे या सगळ्यांचा समावेश* असेल. रेल्वे तिकीट आरक्षित करणारे एजंट झाल्यानंतर एजंट आयआरसीटीसीवरील सगळी रेल्वे तिकिटे अकबर ट्रॅव्हल्सच्या पोर्टलवरुन आरक्षित करू शकतात.
आयआरसीटीसीचे अधिकृत एजंट कितीही रेल्वे तिकिटे आरक्षित करू शकतात. दररोज किंवा महिन्याला तिकिटांची कोणतीही मर्यादा नाही.
होय. काऊंटरवरील तिकिटे खुली झाल्यानंतर १५ मिनिटांनी नोंदणी झालेले एजंट रेल्वे तिकीट आरक्षित करू शकतात.
एजंट वातानुकुलीत डब्याकरता सकाळी १०:१५ वाजता आणि शयनयाना करता ११:१५ वाजता तिकीट आरक्षित करू शकतात.
तत्काळ कन्फर्म तिकिटाचा कोणताही परतावा मिळत नाही. प्रवाश्याला तत्काळ तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
रेल्वे तिकीट आरक्षित करण्याखेरीज, आयआरसीटीसी एजंटला बऱ्याच मोफत पर्यटन सेवा मिळतील. जसे की, विमानाचे तिकीट, आयआरसीटीसी हॉटेलचे आरक्षण, व्हिसा सेवा, बस तिकीट आरक्षण, भारत टूर पॅकेज, आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज आणि विमा इत्यादी.
नाही. अकबर ट्रॅव्हल्समार्फत आयआरसीटीसी वेबसाईटवर थेट लॉगईन करण्याची सुविधा दिली जात नाही. याखेरीज वन स्टॉप पोर्टलची सुविधा दिली जाते. इथे वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तिकीट आरक्षित करता येतात आणि प्रवासी सेवांवर वेळोवेळी उत्तम डील्स मिळतात. कधीतरी तांत्रिक बिघाडामुळे आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडते. अशावेळी इथे तिकीट आरक्षित करण्यात अनावश्यक वेळ जातो. रद्द केलेल्या तिकिटाचा परतावा मिळायलाही ७ दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. अकबर ट्रॅव्हल्सकडून रद्द झालेल्या तिकिटाचा परतावा लगेच दिला जातो. वेबसाईटवर तिकिटे आरक्षित करायला कोणतीही अडचण येत नाही. आमचे एकच उद्दिष्ट आहे: रेल्वे तिकिटे आरक्षित करण्याचा अनुभव सुखकर व्हावा.
आयआरसीटीसी एजंटची सोय व्हावी, त्यांचे काम आरामदायी पद्धतीने व्हावे याकरता खास आम्ही हे आयआरसीटीसी पोर्टल तयार केले आहे. यावर तुम्हाला विनाअडथळा तिकीट आरक्षित करण्याचा उत्तम अनुभव येईल. हे पोर्टल वापरण्याचे फायदे पुढीलप्रमाणे:
आयआरसीटीसी एजंटची सोय व्हावी, त्यांचे काम आरामदायी पद्धतीने व्हावे याकरता खास आम्ही हे आयआरसीटीसी पोर्टल तयार केले आहे. यावर तुम्हाला विनाअडथळा तिकीट आरक्षित करण्याचा उत्तम अनुभव येईल. हे पोर्टल वापरण्याचे फायदे पुढीलप्रमाणे:
चला तर मग, तुम्ही आयआरसीटीसी एजंट व्हायला तयार आहात? १०,०००+ पेक्षा जास्त एजंट असलेल्या आमच्या परिवाराचा भाग व्हा!
Copyright © 2022 www.akbartravels.com. All Rights Reserved.